
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी बांदा यांच्यावतीने शहराच्यावतीने विविध कार्यक्रम करण्यात आले. नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी श्री.देव बांदेश्वर मंदिरात श्रीचरणी अभिषेक करण्यात आला. तसेच,बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात,रुग्णांना फळे वाटप व बेडशीट ,पिलो कव्हर देण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, महिला जिल्हा अध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर,बांदा मंडळ अध्यक्ष, मधु देसाई, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य जावेद खतीब, राजाराम उर्फ बाळू सावंत, माजी सरपंच दीपक सावंत, ग्रामपंचायत सदस्य शाम मांजरेकर, गुरु सावंत, बाबा काणेकर, साई धारगळकर, सुनील धामापूरकर, राकेश केसरकर, गुरु धारगळकर, राजा सावंत, विकी कदम, निलेश कदम, माजी पंचायत समिती सदस्या राखी कळगुंटकर, युवक अध्यक्ष साई सावंत, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, स्वप्नील सावंत, विनेश गवस, सुरेश गावडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.










