
सावंतवाडी : येथील जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण समारंभ पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. तसेच भारतमाता डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन यावेळी करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी विशाल परब म्हणाले, भाजप हा केवळ एक राजकीय पक्ष नसून तो विचारांची, त्यागाची आणि देशसेवेची एक सशक्त चळवळ आहे. सामान्य कार्यकर्त्याच्या कष्टावर उभा असलेला हा पक्ष आज देशाच्या विकासाचा आधारस्तंभ बनला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने निस्वार्थ भावनेने समाजासाठी काम करत राहणे हीच खरी पक्षसेवा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाच्या नव्या उंची गाठल्या असून, या विचारधारेचा प्रसार गावागावात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. याप्रसंगी जिल्हा कार्यकारणी सदस्य मनोज नाईक, उपसभापती गौरव मुळीक, माजी नगरसेवक राजू बेग, युवा मोर्चा शहराध्यक्ष हितेन नाईक, नगरसेवक सिद्धार्थ भांबुरे, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, शिरीष नाईक, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, साईनाथ जामदार शक्ती केंद्र प्रमुख, उपाध्यक्ष सुमित वाडकर, संतोष गावस, समीर कुडाळकर, विजय रेडकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










