
सावंतवाडी : शहरात दोन दुचाकीत समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना काल रात्री नऊ वाजता सुमारास शासकीय गोदामा समोर घडली. यात सौरभ मालणकर (रा. सालईवाडा) व श्रीराम ठाकूर (रा. आरोस) असे दोघे जखमी झाले. जखमींना भाजपच्या अनिकेत आसोलकर यांच्या कारमधून अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोदाम परिसरात या गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले. यात सौरभ हा रस्त्यावर कोसळलेल्या अवस्थेत होता. यावेळी त्याठिकाणाहून जाणाऱ्या भाजपच्या अनिकेत आसोलकर यांनी आपल्या कारमधून जखमींना रुग्णालय दाखल केले. यावेळी पत्रकार अमोल टेंबकर, संकल्प धारगळकर, राजू कासकर, निखिल पाटील, सचिन मोरजकर, आदींनी त्यांना मदतकार्य केले.










