
सावंतवाडी : पत्रकार राजेश नाईक यांची अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोकण संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या घटकांचे हित जपण्यासाठी आणि या माध्यमाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, महासचिव विकास भोसले आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत यांच्या आदेशानुसार ही महत्त्वाची जबाबदारी राजेश नाईक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र स्तरातून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.










