
सावंतवाडी : भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी येथील जनसंपर्क कार्यालयात सेल्फी पॉईंटचे उद्घाटन उत्साहात पार पडले. सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्या हस्ते या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जनसंपर्क अधिक बळकट करण्यास मदत होणार असल्याची भावना यावेळी श्री. परब यांनी व्यक्त केली.










