खा. नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात क्रिकेट स्पर्धा

स्पर्धेचं खासदार नारायण राणेंना निमंत्रण
Edited by: विनायक गांवस
Published on: April 05, 2026 17:32 PM
views 33  views

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बांदा पाटेश्वर मैदान येथे होणाऱ्या ह्या स्पर्धेचे खासदार नारायण राणे यांना निमंत्रण देण्यात आले. 

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतिब, माजी उपसरपंच बाळु सावंत, मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई आदी उपस्थित होते. ‌या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १ लाख रुपये व द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये व बेस्ट बैट्समैन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर व इतर उत्तेजनार्थ बक्षीस व खासदार चषक प्रदान करण्यात येणार आहे .ही स्पर्धा एक गाव एक संघ व दोन आयकॉन खेळाडू असतील अशी माहिती दिली.