सिंधूरत्न टॅलेंट सर्चमध्ये अवनी बावकर गुणवत्ता यादीत

Edited by: विनायक गांवस
Published on: April 05, 2026 16:56 PM
views 24  views

सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी प्रशालेतील  इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अवनी रामनाथ बावकर हिने शैक्षणिक वर्ष-२०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या सिंधूरत्न टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये १७० गुणांनी गुणवत्ता यादीत पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये अव्वल येऊन प्रशालेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलेला आहे.  या यशामुळे तिची सिंधूरत्न संस्थान तर्फे इस्रो सफरीसाठी निवड झाली आहे. अवनी हिला प्रशालेचे सहाय्यक शिक्षक पी. बी. बागुल यांचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव प्रसाद नार्वेकर, संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, पर्यवेक्षक सुबोध वराडकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, प्रशालेचे शिक्षक वृंद, शिक्षकेतर वृंद, पालक यांच्यावतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.