शुभम घावरे यांचा सामाजिक बांधिलकीच्या कार्याला मदतीचा हात

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 29, 2026 16:27 PM
views 20  views

सावंतवाडी : वाढदिवसाचे औचित्य साधून शुभम रावजी घावरे यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याला मदतीचा हात दिला आहे. त्यांनी संस्थेच्या रुग्णोपयोगी साहित्यामध्ये भर म्हणून एक 'कमोड चेअर' भेट दिली. 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'च्या माध्यमातून गरजू रुग्णांना विविध आरोग्यदायी व रुग्णोपयोगी साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाते. या संस्थेचे कार्य पाहून श्री. घावरे यांनी आपल्या वाढदिवशी सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन हे साहित्य सुपूर्द केले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, शरदिनी बागवे आणि लक्ष्मण कदम उपस्थित होते.