भाजपच्या 'SIR' अभियानाच्या विधानसभा प्रमुखपदी संदीप गावडे

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 29, 2026 15:25 PM
views 32  views

सावंतवाडी : येथील विधानसभा मतदारसंघात भाजपच्या 'SIR' अभियानाला वेग आला असून या मोहिमेच्या विधानसभा प्रमुखपदी (BLA-1) जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे अचूक सक्षमीकरण करणे आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करणे हा या निवडीचा मुख्य उद्देश आहे. संदीप गावडे यांच्या अनुभवावर विश्वास टाकून त्यांच्यावर २७०-सावंतवाडी मतदारसंघाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून, राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.