राजा शिवाजी चौक लोकवर्गणीतून अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार

बबन साळगावकर यांची घोषणा
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 22, 2026 16:53 PM
views 34  views

सावंतवाडी : राजा शिवाजी चौक येथे लवकरच लोकवर्गणीतून भव्य - दिव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. राजा शिवाजी चौक येथे गुढीपाडव्या निमित्त सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

साळगावकर म्हणाले, भाजप  प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांची लवकरच भेट घेऊन हा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवून त्यानंतर सर्व शिवप्रेमींना एकत्र करून कमिटी स्थापन केली जाईल असे सांगितले . मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, रवी जाधव, उपाध्यक्ष दिलीप पवार बंड्या तोरस्कर,सचिव दीपक सावंत , महादेव राऊळ यांनी हा प्रस्ताव एकमताने साळगावकर यांच्यासमोर ठेवला होता. त्यामुळे या विषयाला दिशा देण्याचे काम बबन साळगावकर यांनी केले.

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व सकल मराठा व हिंदू समाजाचे जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे यांनी यासाठी ताकदीने कामाला लागून पूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले. तर नवनिर्वाचित  प्रभारी नगराध्यक्ष ऍड.अनिल निरवडेकर यांनीही मदत करू असे आश्वासन दिले.या प्रसंगी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, नगराध्यक्ष ऍड.अनिल निरवडेकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, रोटरी क्लब अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक ऍड सिद्धार्थ भांबुरे,यशवंत देसाई,विजय सावंत,अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, उपाध्यक्ष दिलीप पवार, उपाध्यक्ष अरुण घाडी, सचिव दिलीप पवार, सहसचिव महादेव राऊळ, प्रसिद्धी प्रमुख रवी जाधव, मनोज घाटकर, सत्यम सावंत,नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, संजय पेडणेकर, प्रदीप भालेकर, दिलीप भालेकर, मनोज राऊळ, वासुदेव खानोलकर, संजय साळगावकर, सुंदर गावडे, शुभम मळकाचे उपस्थित होते.