राजू शेट्टींना रास्ता रोको आंदोलनाबाबत पोलिसांची नोटीस

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: March 22, 2026 17:00 PM
views 17  views

कणकवली : आंबा काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी 23 मार्चला नांदगाव येथे आंदोलन करणार असल्याच्या इशाऱ्याची आता कणकवली पोलिसांनीही दखल घेतली आहे कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी राजू शेट्टी यांना नोटीस बजावली आहे मनाई आदेशाच्या कारणास्तव सदरचा आंदोलन स्थगित करावे आंदोलन कालावधीत आंदोलकांकडून अनुचित प्रकार घडल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असा इशाराही नलावडे यांनी श्री शेट्टी यांना‌ नोटिसद्वारे दिला आहे. सदरची नोटीस माजी आमदार वैभव नाईक यांनाही देण्यात आल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली आहे.

नोटिसीत म्हटले आहे, भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ चे कलम १६८ मधील अधिकार व शक्तीचा वापर करून आम्ही सूचित करत आहोत. आपल्या मागण्या सनदशिर मार्गाने पुर्ण करून घेऊन रास्तारोको आंदोलन स्थगित करावे. सिंधुदुर्ग जिल्हयात संपूर्ण भुभागात म.पो.अधि. १९५१ चे कलम ३७(१) (अ) ते (फ), ३७ (३) प्रमाणे २० मार्च  ते ३ एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू आहे. सदर आंदोलन मुदतीत आपल्याकडून अगर आपल्या सहकाऱ्यांकडुन प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या शासकिय, खाजगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास, आक्षेपार्ह घोषणा, चिथावणीखोर वक्तव्य तसेच कोणतीही अप्रिय घटना घडून सार्वजनिक शांतता भंग झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील व प्रचलित कायदयानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसित म्हटले आहे.