श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ आयोजित अभंग गायन स्पर्धा थाटात

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 22, 2026 16:49 PM
views 22  views

सावंतवाडी : तालुक्यातील आरोस येथील गिरोबा रंगमंचावर गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ, आरोस आयोजित अभंग गायन स्पर्धा १९ व २० मार्च रोजी मोठ्या दिमाखात पार पडली. ही स्पर्धा बालगट व मोठा गट अशा दोन विभागात घेण्यात आली. या स्पर्धेत बाल गटात कु.दक्षता बाबुराव घोगळे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर मोठ्या गटात कुडाळ येथील कु.श्रुती सावंत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. तत्पूर्वी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजु परब यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून पार पडले. यावेळी आरोंदा जि.प.सदस्य सुदन कवठणकर, मळेवाड जि.प. सदस्या सौ. अपर्णा प्रभू , सातार्डा पं. स. सदस्य उदय पारिपत्ये, मळेवाड पं. स. सदस्या सौ धनश्री मराठे, आरोंदा पं. स.सदस्या सौ.स्नेहा कांबळी, न्हावेली पं.स.सदस्य श्री शरद धाऊसस्कर, सरपंच शंकर नाईक, कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर, शिवसेना युवा तालुकाध्यक्ष क्लेटन फर्नांडिस, बाळा शिरसाट, निलेश उर्फ बाळा परब, निखिल नाईक, प्रसाद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

 दोन दिवस चाललेली ही अभंग गायन स्पर्धा अतिशय उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. दिनांक १९ मार्च रोजी बालगटाची गटाची स्पर्धा झाली. यावेळी बाल गटात द्वितीय क्रमांक कु.चिन्मयी मेस्त्री आणि तृतीय कु.सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर याने पटकावला. कु. अथर्व चंद्रकांत पिकुळकर व कु.सान्वी धोंडी गावडे यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविले. बाल गटातील स्पर्धेचे परीक्षण प्रा.प्रशांत धोंड, माणगाव यांनी केले. दिनांक २० मार्च रोजी पार पडलेल्या मोठ्या गटातील स्पर्धेत पूर्वा धाकोरकर, सावंतवाडी हिने द्वितीय क्रमांक तर कुडाळ येथील सुखी श्रीकृष्ण सामंत हिने तृतीय क्रमांक पटकावला. ऋचा संजय पिळणकर, माणगाव, रिया मेस्त्री, आरवली व सुनील गोवेकर, मळेवाड यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेची बक्षिसे, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेसाठी बाल गटातील सर्व रोख बक्षिसे आरोस येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश उर्फ बाळा परब कुटुंबियांनी पुरस्कृत केली होती तर मोठ्या गटातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मनोज नाईक, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस दीपक पटेकर (दीपी), सावंतवाडी, तृतीय क्रमांक बक्षीस संदेश देऊलकर, तर उत्तेजनार्थ बक्षिसे रुपेश दळवी व वीरेंद्र नाईक, सत्यवान नाईक यांनी पुरस्कृत केली होती. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ गायक श्रीपाद चोडणकर व स्वप्निल गोरे यांनी केले तर गायकांना संगीत साथ निलेश मेस्त्री हार्मोनियम, किशोर सावंत तबला व भास्कर मेस्त्री यांनी ताल साथ दिली. निवेदन काका सावंत यांनी केलं. या स्पर्धेसाठी मालवण पर्यंत संपूर्ण जिल्हाभरातून स्पर्धक आले होते हे विशेष. बालगटात २५ स्पर्धकांची चाचणी घेऊन निवड करण्यात आलेली तर मोठ्या गटात २० स्पर्धकांना निकषानुसार संधी देण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी निखिल नाईक, प्रसाद नाईक, महेश कुबल, निलेश तथा बाळा परब सह श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती.