आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 17, 2026 18:42 PM
views 22  views

सावंतवाडी : शिवसेना नेते, कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐळवे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, नगरसेविका शर्वरी धारगळकर,स्नेहा नाईक, सुप्रीता धारणकर, शिवानी पाटकर, भारती परब, पूजा नाईक,अनघा सावंत, संजना आंबेरकर, नम्रता वाडकर, छगुप्ता पडवेकर, कांचन जाधव, संध्या पाटणकर, साधना मोरे, उज्वला तुवेकर, नीलम कुमठेकर, राजश्री निर्गुण आदी उपस्थित होत्या.