'पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स' आता सावंतवाडीत

शनिवारी १४ मार्चला उद्घाटन
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 13, 2026 19:42 PM
views 48  views

सावंतवाडी : शुद्धता आणि विश्वासाची प्रदीर्घ परंपरा लाभलेले जगविख्यात 'पु. ना. गाडगीळ (पीएनजी) ज्वेलर्स' आता सावंतवाडीकरांच्या सेवेत दाखल होत आहे. सावंतवाडी येथील 'पंचमी हाईट्स'मध्ये या भव्य दालनाचा उद्घाटन सोहळा उद्या शनिवारी १४ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजता संपन्न होणार आहे.

या सुवर्णदालनाचे उद्घाटन सावंतवाडीचे आमदार, माजी मंत्री  दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयसीआयसीआय बँक कुडाळचे ब्रॅन्च मॅनेजर महेंद्र सावंत उपस्थित राहणार आहेत. पंचमी हाईटस, सारस्वत बँक जवळ, मोती तलाव समोर हा शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन पीएनजी ज्वेलर्सचे डॉ. सौरभ गाडगीळ, पराग गाडगीळ, वृषाली संजय पिंगुळकर, श्रुती मंगेश हळदणकर आणि शंतनु संजय पिंगुळकर यांनी केलं आहे.