
सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेचा कार्यक्रम आज पार पडणार आहे. यामध्ये उपसभापती पदासाठी गौरव मुळीक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे सभापती आणि उपसभापती तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाकडे जाणार असल्याचे चित्र आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार गौरव मुळीक यांची उपसभापतीपदासाठी नाव निश्चित करण्यात आली आहे. दुपारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यानंतर त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणार आहे. दरम्यान, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी पुष्पगुच्छ देऊन गौरव मुळीक यांचे अभिनंदन केले. यावेळी सभापती आनंद नेवगी, महेश धुरी, प्राजक्ता केळुसकर, प्रशांत सुकी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते










