
सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला पोलीस ठाणे ही संकल्पना अंमलात आणत सायंकाळी 'इव्हीनींग सेफ्टी वॉक' आयोजित करण्यात आला होता.
मोती तलाव परिसरात पोलिस महिलांनी याच आयोजन केलं होत. यामध्ये शहरातील महिलांनी देखील सहभाग घेतला होता. तलाव काठावरून हा इव्हीनींग वॉक संपन्न झाला. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीमती मुल्ला, पोलिस उप निरीक्षक माधुरी मुळीक, महिला पोलीस जमादार वर्षा पवार, हवालदार ज्योती दुधवडकर, श्रीम. वेंगुर्लेकर, श्रीम. दळवी, श्रीम.जोशी, श्रीम. धुमाळे, श्रीम. नाईक, श्रीम. पाटील तसेच महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, घे भरारी फाउंडेशनच्या मोहिनी मडगावकर, संध्या पवार, शारदा गुरव, स्वप्नाली कारेकर, वैष्णवी बांदेकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.










