
सावंतवाडी : कोकणच्या पवित्र भूमीत डिजिटल मिडियाचे क्रांतीपर्व निर्माण करणारे कोकणचे नंबर १ महाचॅनेल ‘कोकणसाद LIVE’ चा १२ वा वर्धापनदिन सोहळा रविवार दि. १ मार्च २०२६ रोजी सायं. ५ ते ७ या वेळेत सावंतवाडी खासकीलवाडा येथील मांगिरीश बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मंत्री, आमदार, विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबू क्रांतीतून अर्थक्रांती घडविणार्या उद्योजक मोहन होडावडेकर यांना ‘कोकणसाद LIVE’चा सर्वोच्च सन्मान ‘कोकणरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.
तर विविध क्षेत्रात अमूल्य योगदान देणार्या मान्यवरांना स्मार्ट लिडर पुरस्काराने गौरविले जाणार आहे. तसेच ‘गणेश सजावट स्पर्धा २०२५’चे बक्षीस वितरणही यावेळी होईल.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणार्यांचा ‘स्मार्ट लिडर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यात दोडामार्ग तालुक्यातील नाट्य अभिनेता, दिग्दर्शक गणेश ठाकूर, आडाळीचे सरपंच पराग गावकर, पंचायत समिती सदस्य सोनिया नाईक, विनायक सुझुकी, कुडाळचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र तेरसे, देवगडचे तहसिलदार रमेश पवार, वेंगुर्ले तालुक्यातील माजी जि.प. आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पं. स. सदस्य सचिन देसाई, सोनाळी सरपंच भीमराव भोसले, बांधकाम सभापती रणजित तावडे, लोरे सरपंच विलास नावळे, उद्योजक विजय तावडे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, मणचेचे पं. स. सदस्य विष्णू घाडी यांचा गौरव होणार आहे.
गणेश सजावट स्पर्धेचे आज बक्षीस वितरण
कोकणचं नं. १ महाचॅनेल कोकणसाद LIVE च्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून मे. श्रीराम सोलर आणि बोअरवेल्स प्रायोजित आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक लिमिटेड सहप्रायोजित या स्पर्धेचं हे सलग ११ वे वर्ष होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. एका पेक्षा एक हटके देखावे यात स्पर्धकांनी साकारले होते. मात्र यात बाजी मारली ती नाधवडे वैभववाडी येथील देवेंद्र चंद्रकांत कांबळे यांनी. देवेंद्र चंद्रकांत कांबळे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. निरवडे सावंतवाडी येथील मनोज मदन बांदिवडेकर द्वितीय क्रमांकाचे मानकरी, तर उंबर्डे, वैभववाडी येथील सावंत परिवार यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
तर उमेश पुरुषोत्तम मांजरेकर, रेवतळे, मालवण, राजेश नवसू गवस, झोळंबे दोडामार्ग, विठ्ठल माधव, पाट माधववाडी, कुडाळ, कौस्तुभ गुरुनाथ कोयंडे, पिरवाडी, जामसंडे- देवगड, विनय विलास सोपटे - कवठणी, सावंतवाडी, कै. नागेश वासू जाधव, वझरे, दोडामार्ग ( यांच्या घरचा गणपती ), विष्णुप्रसाद संतोष सावंत, कुंब्रल, दोडामार्ग, नंदकुमार शांताराम वळंजू, खांबाळे, वैभववाडी, संतोष श्रीपत साळुंखे, कुसूर, वैभववाडी, ओजस माडये, परुळे, कुशेवाडा, वेंगुर्ला यांना उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाले. या सर्वांना आज बक्षिसांचे वितरण होईल.










