
सावंतवाडी : शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत - कविटकर यांनी प्रभाग क्रमांक ५ मध्ये झंझावाती प्रचार केला. नगरसेवक पदासाठीचे उमेदवार माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर व बंड्या कोरगावकर यांचाही प्रचार त्यांनी केला.
यावेळी ॲड. निता सावंत-कविटकर यांनी शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद बघता आपला व नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी शिवसेना महिला शहरप्रमुख भारती मोरे, उमेदवार उत्कर्षा सासोलकर, बंड्या कोरगावकर, धारगळकर, सुधीर धुमे, नार्वेकर, कोरगावकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










