
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 11 आणि नगरसेवक पदासाठी 114 असे एकूण 125 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजच्या शेवटच्या दिवशी एकूण 62 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या अकरा वाजता या अर्जावर छाननी प्रक्रिया होणार आहे. छाननी प्रक्रियेनंतर 21 तारीख पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. या निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. अजित पवार गट वगळता सर्वच पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रिंगणात उतरलेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची पाहायला मिळणार आहे.
नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवारांनी एकुण 11 उमेदवारी अर्ज दाखल केले. यात श्रद्धा भोंसले यांनी भाजप 1 व अपक्ष 2 असे एकुण 3 अर्ज, अन्नपुर्णा कोरगावकर यांनी 2, सीमा मठकर यांनी उबाठा शिवसेनेकडून 1, शिंदे शिवसेनेकडून ॲड. निता सावंत-कविटक, काँग्रेसकडून साक्षी वंजारी आणि भारती मोरे यांनी प्रत्येकी 1 तर निशाद बुराण यांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले.
शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी ॲड. सायली दुभाषी, देव्या सुर्याजी, सुरेंद्र बांदेकर, वेदीका सावंत, उत्कर्षा सासोलकर, शर्वरी धारगळकर, अनारोजीन लोबो, संजू परब, बंड्या कोरगावकर, हर्षा जाधव, बाबु कुडतरकर, स्नेहा नाईक, संजना पेडणेकर, पुजा आरवारी, गोविंद वाडकर, वैभव म्हापसेकर, अजय गोंदावळे, दिपाली सावंत,बासित पडवेकर, आरती सावंत,परिक्षीत मांजरेकर, नासिर पटेल अशा २२ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल. भाजपकडून मोहिनी मडगावकर, दुलारी रांगणेकर, बबन साळगावकर, सुनिता पेडणेकर, उदय नाईक, समृद्धी विर्नोडकर, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, सुधीर आडीवरेकर, सुकन्या टोपले, राजू बेग, मेघना राऊळ,साईनाथ जामदेव, ॲड. अनिल निरवडेकर, मेशव शेख, अमित गवंडळकर, विणा जाधव, मेघा डुबळे, गौरव जाधव, मेघना साळगावकर, गोपाळ नाईक, ॲड. रूजूल पाटणकर, सुकन्या टोपले, निलम नाईक अशा २४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून निशांत तोरसकर, आर्या सुभेदार, शैलेश गवंडळकर, तेजल कोरगावकर, कृतिका कोरगावकर, संदीप वेंगुर्लेकर, समीरा खलिल, उमेश कोरगावकर, शेखर सुभेदार, क्षीप्रा सावंत, श्रृतिका दळवी, संदीप राणे, क्षीप्रा सावंत, नियाज शेख, देवेंद्र टेमकर, गजानन वाडकर, दिप्ती केसरकर, अफरोज राजगुरू, प्रदीप कांबळे, गिता सुकी, निकिता केसरकर मिळून एकुण २१ तर कॉग्रेसकडून तौकीर शेख, शिल्पा कांबळी, गणपत नमशी, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, स्नेहल मसुरकर, सुनील पेडणेकर, निशाब शेख, ॲड. समीर वंजारी, ॲड. रितू परब, साक्षी वंजारी, अरूण भिसे, संतोष जोईल, ॲड. प्रज्ञा चौगुले, सुमेधा सावंत, शाम वाडकर, प्रणाली नाईक असे १६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उदय भोसले, आगस्तीन फर्नांडिस, दिशा कामत, रंजना निर्मल, ॲड. सत्यवान चेंदवणकर असे ५ तर प्रसाद नाईक, ऋग्वेद सावंत, बबलू मिशाळ, आशुतोष हेळेकर, नासिर शेख, हरेश कोटेकर, शबाब शेख, अर्चित पोकळे, लतिका सिंग, राधिका चितारी, अस्मिता परब, नासिर पटेल, सुरेश भोगटे, समिउल्ला ख्वाजा, जावेद शाह, फरलाद बागवान, गौरव जाधव या १७ जणांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत.










