
सावंतवाडी : नगरपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून मनसेने 'एन्ट्री' केली आहे. जिल्हाप्रमुख ॲड. अनिल केसरकर यांच्या पत्नी सौ. दीप्ती केसरकर आणि गजानन वाडकर यांनी प्रभाग क्रमांक २ मधून आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
मनसे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणार असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर लढणार आहोत, असे यावेळी ॲड. केसरकर यांनी सांगितले. यावेळी ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, मनसे शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, सतीश आकेरकर, सुनील सावंत, अतुल केसरकर, सारिका कासकर आदी उपस्थित होते.










