
सावंतवाडी : अपेक्षा व्यक्त न करता प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण माझं नाव घेतात यातच मी खुष आहे. विशाल परब यांच नाव फक्त सावंतवाडी शहरापुरत मर्यादीत नाही. मलाही नगरपरिषदेपुरत मर्यादीत राहायचं नाही. सर्व महिलांना संधी मिळावी हा माझा हेतू असून रविंद्र चव्हाण, नितेश राणेंच्या शब्दाबाहेर आम्ही नाही असं मत सौ. वेदिका परब यांनी व्यक्त केले.
सावंतवाडीचा विकास आम्हाला करायचा आहे. आमचा विकास हा असा असेल की इथल्या आमदारांना देखील विचार करायला लावेल असा आमचा विकास असेल असा दावा केला. एक नगरपरिषद काय करू शकते हे दाखवून देऊ. भाजपच्या माध्यमातून हा विकास आम्ही करून दाखवू. महाराष्ट्रापासून देशात भाजपची ताकद आहे. त्यामुळे इथला विकास थांबणार नाही. भाजपचाच गुलाल निकालानंतर दिसेल असा विश्वास सौ. परब यांनी व्यक्त केला. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.










