होमपीचवर केसरकरांच वादळ | 'संजू-बाबू' साथीला ! शिवसेनेच शक्तीप्रदर्शन

ॲड. निता सावंत - कविटकरांचा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
Edited by: विनायक गांवस
Published on: November 16, 2025 12:24 PM
views 265  views

सावंतवाडी : अखेर माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या होमपीचवर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसेनेच्या माध्यमातून ॲड. निता सावंत-कविटकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुकाप्रमुख बबन राणे, दिनेश गावडे, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अशोक दळवी आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शेकडोजण उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. नगराध्यक्षपदासह नगरसेवक निवडून येतील असा दावा केला. शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर व उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.