
सावंतवाडी : माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी श्री देव पाटेकराचे आशीर्वाद घेतले. थोड्याच वेळात नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून ॲड. निता सावंत - कविटकर तसेच २० उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी इच्छुक उमेदवारांसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










