
सावंतवाडी : शहरात अवैध दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या दोघांवर सावंतवाडी पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत गुन्हे दाखल केलेत. त्यांच्याकडून एकूण ९० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजित किंमत १२ हजार रुपये आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत सिद्धू मुलीमणी (वय २६, रा. जिमखाना, ता. सावंतवाडी) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ४,००० रुपये किमतीच्या ४० दारूच्या बाटल्या मिळून आल्या. सायंकाळी ७:०० वाजता. सिद्धू मुलीमणी याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका कारवाईत, महेश वेंगुर्लेकर (वय ४२, रा. सालईवाडा, सावंतवाडी) याच्याकडे ८,००० रुपये किमतीच्या ५० दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पीएसआय माधुरी मुळीक, हवालदार ज्योती दुधवडकर आणि हवालदार अनिल धुरी यांचे पथकानं ही कारवाई केली. दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंतवाडी पोलिसांनी ही कारवाई अवैध दारू विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी केली असून, या दोन्ही घटनांमध्ये अधिक तपास सुरू आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.










