
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च बिगूल वाजलं असून आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, पहिल्या दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
कागदपत्रांची पूर्तता करण्याची लगबग उमेदवारांकडून सुरू असून अर्ज दाखल करण्यासाठी ते शुभ मुहूर्ताची वाट ते बघत आहेत. येणारा रविवार वगळता
१७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. नामनिर्देशन मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर २०२५ असून २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.












