मळेवाडमध्ये नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: October 27, 2025 17:49 PM
views 61  views

सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड - कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे यांच्यावतीने मळेवाड (जकातनाका) येथे गाव मर्यादित आकाश कंदील तसेच आमंत्रित नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्ष दर्शना शिरसाट यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. 

तसेच आकाश कंदील स्पर्धेचा शुभारंभ मळेवाड कोंडुरे सरपंच पार्सेकर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.या स्पर्धेत मळेवाड कोंडुरे गावातील स्पर्धकांनी आकाश कंदील स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला तर नरकासुर स्पर्धेसाठी भव्य दिव्य असे 22 नरकासुर घेऊन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. नरकासुर स्पर्धेतील प्रत्येक सहभागी निमंत्रित स्पर्धकाला आयोजकांकडून रोख रक्कम,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी

एकापेक्षा एक असे भव्य दिव्य नरकासुर पाहण्यासाठी नागरिकांची बरीच मोठी गर्दी झाली होती.तसेच वेगवेगळ्या प्रकारातील आकाश कंदील सुद्धा नागरिकांचा लक्ष वेधून घेत होते. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ मिलन पार्सेकर उपसरपंच हेमंत मराठे, अटल प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष नकुल पार्सेकर,तंटामुक्ती अध्यक्ष दर्शना शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, महेश शिरसाट,स्नेहल मुळीक, सानिका शेवडे, अर्जुन मुळीक,कविता शेगडे, आदिशक्ती अभियान अध्यक्ष ज्योति शिरसाट,पोलिस पाटील दिगंबर मसुरकर, राजाराम मुळीक, डॉ.गणपत टोपले,लाडोबा केरकर, वैभव मोरुडकर,अमित नाईक,नंदू नाईक, माजी सरपंच सचला केरकर, आल्हाद नाईक, प्रमोद मुळीक, परशू मुळीक, भिवसेन मुळीक, सर्व सी आर पी,आशा, अंगणवाडी सेविका,नंदू नाईक,बाळू नाईक, बबन राऊत, गुरु नाईक,सतीश सातार्डेकर, गजानन शिरसाट मोठ्या संख्येने ग्रामस्थ रसिक प्रेक्षक उपस्थित होते.