आरोंदा जि. प. मतदारसंघात भाजपा पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा

Edited by: विनायक गांवस
Published on: October 26, 2025 15:15 PM
views 30  views

सावंतवाडी : आगामी जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आरोंदा येथील सातेरी भद्रकाली सभागृहात पार पडला. पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मंत्री राणे यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यास महिला जिल्हाप्रमुख श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.