'मेक ईन कोकण' ची उत्पादने जगात ओळख निर्माण करणार : विशाल परब

Edited by: विनायक गांवस
Published on: October 20, 2025 12:17 PM
views 28  views

सावंतवाडी : कोकणवासीयांच्या संकल्पनांना, सृजनशिलतेला, नवनिर्मितीला, नवकौशल्याला वाव देण्यासाठी "मेक ईन कोकण" अंतर्गत भारतीय जनता पार्टी आयोजित भव्य "उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५" च आयोजन करण्यात आले होते. "मेक ईन कोकण" ची उत्पादने ही जागत स्वतंत्र ओळख निर्माण करणार असा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला. या विक्री प्रदर्शनांच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते. 

भारतीय जनता पार्टीचे 'युवा नेते विशाल परब यांच्या  माध्यमातून आत्मनिर्भर कोकण या अभियानाअंतर्गत 'मेक ईन कोकण' ला चालना देण्यासाठी भव्य "उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव"चे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला युवा नेते विशाल परब व सौ. वेदिका विशाल परब यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सहभागी स्टॉल धारकांशी  संवाद साधला. महिला मंडळं, महिला बचत गट ते सर्व क्षेत्रातील उद्योजकांची उत्पादनं, स्थानिक उद्योजकांशी परब दांपत्यानी चर्चा केली.  वेळेत अर्थहाय्य,  उत्पानाला प्रोत्साहन आणि उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणारी एक स्थानिक व्यवस्था असली पाहिजे अशी मागणी यावेळी उद्योजकांनी केली. हा उद्योजक महोत्सव पुढील वर्षी मोठ्याप्रमाणात आयोजित करून मेक ईन कोकण उत्पादनांना जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रीत प्रयत्न करण्याचा निर्धार श्री. परब यांनी केला. याप्रसंगी सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई, (जि. का. सदस्य) सुहास गवंडळकर, तालुका अध्यक्ष बाळू देसाई, अजय गोंदावळे, मोहीनी मडगावकर, दिपाली भालेकर, दिलीप भालेकर, ॲड संजू शिरोडकर, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.