
सावंतवाडी : दिवाळीच्या उत्साहाला आणि कलागुणांना वाव देण्यासाठी "आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळ" यांनी यावर्षी भव्य खुली नरकासुर स्पर्धा २०२५ चे आयोजन केले आहे. नरकासुर बनवण्याची कला सादर करण्याची ही एक सुवर्णसंधी सावंतवाडीकरांसाठी उपलब्ध झाली आहे. स्पर्धेत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
शिवरामराजे भोसले पुतळा ते सारस्वत बँक, सावंतवाडी येथे या स्पर्धेच आयोजन आम्ही सावंतवाडीकर मित्रमंडळाकडून करण्यात आलं आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त कलाकारांनी सहभागी होऊन आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवावे, असे आवाहन 'आम्ही सावंतवाडीकर मित्र मंडळा' तर्फे करण्यात आले आहे.