जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांत RPD चा दबदबा

Edited by: विनायक गांवस
Published on: October 19, 2025 15:58 PM
views 17  views

सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 मध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु कॉलेज सावंतवाडीने सालाबादप्रमाणे यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे.     

शालेय रोल बॉल स्पर्धेत पुन्हा एकदा आर. पी. डी. हायस्कूल व ज्यु कॉलेज सावंतवाडी १४ वर्षे वयोगट मुलगे संघाने कु. करण आनंद गवळी याच्या बहारदार कामगिरीच्या जोरावर बाजी मारली आणि उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत सांगली , सातारा या संघावर मात करत अंतिम फेरी गाठली. 

तसेच १७ वर्षे वयोगट मुली यांनी कोल्हापूर मनपा या संघावर मात केली तर १७ वर्षे वयोगट मुलगे यांनी सातारा , इचलकरंजी या संघांना पराभूत करून तृतीय क्रमांक पटकावला. विभागस्तरावरील प्रभावी कामगिरीमुळे आर. पी. डी. हायस्कूल व ज्यु कॉलेज सावंतवाडी प्रशालेच्या एकूण ३६ विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत बोनस गुण म्हणून १० गुण मिळणार आहेत. १४ वर्षे वयोगट मुलगे -

कु. गवळी करण आनंद

कु. हनपाडे धनेश प्रमोद

कु. पाटील पुष्कर विनायक

कु. दराडे वरद विठ्ठल

कु. नाईक धोंडी संजय

कु. बिले साई हेमंत

कु. गावडे संदेश हरेश

कु. सावंत गौरांग सदाशिव

कु. बिरोडकर सोहम भिकाजी

कु. सातार्डेकर विघ्नेश विपिनचंद्र

कु. प्रभावळकर विहान संतोष

कु. सावंत पार्थ उमेश, १७ वर्षे वयोगट मुलगे

कु. सरमळकर यज्ञेश बाळकृष्ण

कु. कोरगावकर सोहम बापूशेट

कु. वालावलकर देवांग बाळकृष्ण

कु. गुरव प्रथमेश भरत

कु. शिर्के स्वर समीर

कु. मातोंडकर स्वर्णिम सगुण

कु. पाटील साईश प्रशांत

कु. नाईक श्रीपाद संजय

कु. राऊळ युवराज यशवंत

कु. सावंत आकाश प्रविण

कु. गवस नवनाथ नारायण

कु. गवंडे चारुदत्त बाबली १७ वर्षे वयोगट मुली - कु. दळवी श्रीया राजाराम

कु. नाईक अनुष्का सत्यप्रकाश

कु. परब श्रावणी सुर्यकांत

कु. लाड विश्वा विद्याधर

कु. मोहिते अंजली प्रकाश

कु. सावंत चिन्मयी नंदकिशोर

कु. सावंत गौरी अरुण

कु. राऊळ कनिका प्रवीण

कु. शिंदे स्नेहा दीपक

कु. राऊळ वैष्णवी उमेश यांनी प्राप्त केले.  या यशस्वितेसाठी RPD प्रशालेला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी , पालक व मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विक्रांत सावंत , उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर , सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष श्री. अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्रीम. संप्रवी कशाळीकर , उपमुख्याध्यापक श्री. एस .एन पाटील , उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक , तसेच पालक ,शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.