
सावंतवाडी : भटवाडी येथे रात्री तीनच्या सुमारास बारा फुटी अजगर पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. सामाजिक बांधिलकीचे पदाधिकारी शेखर सुभेदार यांनी व त्यांच्या मित्र मंडळींनी प्रमोद गावडे (कांडरकर) यांच्या घराशेजारी सुमारे १२ फुटी अजगर रात्री तीनच्या सुमारास पकडून वनविभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक भावना जपली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे पदाधिकारी शेखर सुभेदार हे प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमांमध्ये त्यांच मोठ योगदान आहे.