
सावंतवाडी : कॉग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी यांची पक्षश्रेष्ठींकडून या पदासाठी फेरनिवड करण्यात आली आहे. ऑल इंडिया महिला कॉग्रेसच्या महिला अध्यक्षा अल्का लाम्बा यांनी ही निवड केल्याचे जाहीर केले आहे.
नवी दिल्ली येथून ही निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सौ. वंजारी यांनी पक्षासाठी घेतलेली मेहनत व कामाची दखल घेऊन त्यांना पुन्हा एकदा सिंधुदुर्ग महिला अध्यक्षपदासाठी संधी देण्यात आली आहे. ऑल इंडिया महिला कॉग्रेसच्या महिला अध्यक्षांनी ही निवड केली असून सर्वस्तरातून सौ. वंजारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.