
सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मदतीसाठी व देणगीदारांच्या मनोरंजनासाठी श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव (नितिन आसयेकर प्रस्तुत) संत सद्गुरू देवावतारी बाळूमामाच्या जीवनकथेवर आधारित बाळूमामा भाग २ हे दशावतारी नाटक शनिवार दि. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं ठीक ७ वाजता नेमळे हायस्कूलच्या बालाजी रंग मंच्यावर आयोजित करण्यात आले आहे. सर्व नाट्य प्रेमिनी तसेच आजी माजी विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घेऊन आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन नेमळे शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.