
सावंतवाडी : बुधवारी रात्री एकच्या सुमारास हुबळी धारवाड येथील महिला रात्रीच्या वेळी रस्त्यावरून एकटीच चालताना पोलिसांना माडखोल येथे आढळून आली. रात्रीच्या वेळी ड्युटी बजावत असलेले पोलीस महेश जाधव यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधला. यानंतर त्यांनी तात्काळ सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानची सचिव समीरा खलील, रूपा मुद्राळे व हेलन निबरे तसचे लक्ष्मण कदम यांना त्यांनी घटनास्थळी बोलून घेतल. ती महिला विवाहित असून ती कन्नड बोलत असल्यामुळे तिच्या बाबतीत अन्य माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. तिच्या बोलण्यावरून व तिच्या वागण्यावरून मानसिक स्थिती खालवल्यासारखी वाटत होती. रूपा मुद्राळे, हेलन निबरे व समीरा खलील यांनी तिच्यासाठी कपडे व खाण्या पिण्याचची व्यवस्था केली. जोपर्यंत त्याच्या नातेवाईकांचा शोध लागत नाही तोपर्यंत तिला पोलिसांच्या सहकार्याने सावंतवाडी येथील महिला अंकुर निवारा केंद्रामध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती जाधव यांनी दिली.