पारंपरिक - कलात्मक आकाश कंदीलांचं प्रदर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: October 16, 2025 11:03 AM
views 14  views

सावंतवाडी : दिवाळी निमित्त बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक आणि कलात्मक आकाश कंदील प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

​याप्रसंगी संस्थाध्यक्ष रमेश भट व संस्था सदस्य केदार बांदेकर, प्रकाश मसूरकर, श्याम भाट, प्राचार्य उदय वेले तसेच सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

​या प्रदर्शनात कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले अनेक आकर्षक व कलात्मक कंदील विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. यामध्ये पारंपरिक पद्धतीचे कंदील, दिव्याची रोषणाई, मातीचे, लाकडी, कापडी कंदील अशा विविध प्रकारच्या कंदिलांचा समावेश आहे. हे प्रदर्शन २७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणार आहे. कलाप्रेमींनी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाविद्यालयाकडून केले आहे.