
सावंतवाडी : विलवडे येथील मुंबईस्थित टेंबवाडी उत्कर्ष मंडळ (मुंबई) च्यावतीने विलवडे शाळा नं.२ ला शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत गावडे, विलवडे सरपंच प्रकाश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, टेंबवाडी उत्कर्ष मंडळाचे खजिनदार दीपक सावंत, गोपाळ सावंत, झिलू सावंत, महेश सावंत, महादेव सावंत, देवानंद सावंत, रमण सावंत, शाळा व्यवस्थापन समिती नूतन अध्यक्ष सुनिल सावंत, उपाध्यक्षा विशाखा दळवी, अध्यक्ष रश्मी सावंत, पूर्वा दळवी, मानसी सावंत, आरोही सावंत, मोनिका नाईक, मालू लांबर, अंगणवाडी सेविका सायली दळवी, सुभाष कानसे, श्रावणी सावंत, मनाली दळवी, अश्विनी सावंत, अस्मि सावंत, रितेश सावंत, सिद्भेश सावंत, भालचंद्र गवस, संदीप सावंत अजित दळवी आदी ग्रामस्थ, पालक व आजीमाजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रशांत गावडे यांनी शिक्षणाचे महत्व विषद करीत शाळेच्या भौतिक गरजा पुर्ण करणेचे आश्वासन दिले. यावेळी प्रकाश दळवी यांनी स्यर्धा परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या शाळेच्या विद्यार्थी विशेष अभिनंदन करून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गोपाळ सावंत, महेश सावंत महादेव सावंत, देवानंद सावंत, रमण सावंत शाळेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव व विकासासाठी सहकार्य करणेचे आश्वासन दिले
यावेळी माजी विद्यार्थी सुनिल सावंत, दीपक सावंत, श्रावणी सावंत, झिलू सावंत यांनी या शाळेतील गुरुजनांनी घडविल्यामुळे आम्ही मोठे झाल्याचे सांगितले. तसेच शाळेच्या भौतिक गरजा पुर्ण करणेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगुन त्यासाठी निधीचे संकलन करण्याची ग्वाही दिली. कृष्णा सावंत यांनी शाळेच्या दोन खोल्याचे दुरुस्तीचे काम समग्र शिक्षा योजनेतून अल्पावधीत पुर्ण केल्या बद्दल शाळा व्यवस्थापन समिती, कुशल कारागीर व प्रशासनाचे कौतुक करीत उर्वरीत कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश काळे, सुत्रसंचालन सहशिक्षिका प्रमिला ठाकर तर आभार सुरेश सावंत यांनी मानले.