वस नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण

Edited by: विनायक गांवस
Published on: September 18, 2025 18:19 PM
views 54  views

सावंतवाडी : कोलगाव पांडवनगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली असून गेले सात वर्षे ते या मंडळाचे सातत्याने अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.

तर उपाध्यक्षपदी विजय चव्हाण तर सचिव पदी आनंद चव्हाण सहसचिव पदी रवींद्र चव्हाण पुजारी तथा खजिनदारपदी सदानंद चव्हाण सहखजिनदार अमोल चव्हाण कार्याध्यक्ष अॅड स्वप्निल कोलगावकर आणि मार्गदर्शक म्हणून सागर चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या श्रीदेव वस नवरात्रोत्सव मंडळाकडून नऊ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये दशावतारी तीन नाटकांचा समावेश असून याशिवाय कीर्तन - प्रवचन, फुगडी, दांडिया आणि भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव  साजरा करण्याचा निर्णय नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.