
सावंतवाडी : सफाई कामगार स्वतःच्या जीवावर उदार होऊन शहरातील घाण साफ करतात आणि ठेकेदार त्यांचा पीएफ लुबाडतो, ही 'व्हाईट कॉलर चोरी' आहे अशा शब्दांत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, तुम्ही पंख्याखाली बसता, तर सफाई कामगार घाण साफ करतात अशा कठोर शब्दांत कामगार नेत्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. गेल्या अनेक दिवसांपासून सफाई कामगारांचे पीएफ आणि इतर हक्क डावलले जात असल्याचा आरोप असुन त्यांनी आंदोलन छेडले आहे. यावर तातडीने तोडगा न काढल्यास उद्यापासून पुन्हा काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा सफाई मित्रांनी दिला आहे. या प्रकरणावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी जोर धरत आहे.