
सावंतवाडी : शिल्पग्राम येथील रहीवासी श्रीमती वासंती वसंत महाबळ यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. सावंतवाडी येथील माजी गटशिक्षण अधिकारी कै. वसंत महाबळ यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन जावई, एक मुलगा, सुन, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी येथील माजी वनअधीकारी सुभाष पुराणीक यांच्या त्या सासू होत.










