नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने वेंगुर्ल्यात संगीत भजन स्पर्धा

वेंगुर्ला उबाठा शिवसेनेचे आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: September 14, 2025 14:02 PM
views 31  views

वेंगुर्ला :  वेंगुर्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त २५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर रोजी शिवसेना शाखा, सुंदरभाटले, साईमंगल कार्यालय शेजारी वेंगुर्ला येथे भव्य खुली संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु ७०००/- व चषक, द्वितीय पारितोषिक रु ५०००/- व चषक, तृतीय पारितोषिक ३०००/- व चषक तसेच उत्तेजनार्थ २ पारितोषिके प्रत्येकी १५००/- व चषक देण्यात येणार असून उत्कृष्ट पखवाज, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम, उत्कृष्ट कोरस, उत्कृष्ट झांज वादक यांना प्रत्येकी ७००/- व चषक अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. तरी या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी आपली नांवनोंदणी संदिप पेडणेकर ८४११८२८६६० व पंकज शिरसाट ९६७३५६३२२३ यांच्याजवळ करावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १२ संघाना या स्पर्धेत प्रवेश देण्यात येईल. 

ही भजन स्पर्धा दिनांक २५ सप्टेंबर २०२५ व २६ सप्टेंबर २०२५  या कालावधीत सायंकाळी ५:०० वाजता संपन्न होईल. प्रत्येक भजन मंडळाला ४५ मिनिटे वेळ दिला जाईल. प्रत्येक भजन मंडळात कमीत कमी ८ व जास्तीत जास्त १४ जण भाग घेऊ शकतात. प्रत्येक भजन मंडळात किमान ५ जण टाळ वाजवणारे असावेत. भजनात ढोलकी किंवा इलेक्ट्रिक वाद्याचा वापर करू नये. प्रत्येक भजन मंडळातील सभासदास एकाच भजन मंडळात सहभागी होता येईल याची नोंद घ्यावी. भजनातील गाणी संत वाङमयातील असावीत. भजन मंडळाने स्पर्धेच्या आधी अर्धा तास उपस्थिती दर्शवावी.  प्रत्येक भजन मंडळाने स्वत:च्या वाद्य साहित्यासह उपस्थित राहावे. स्पर्धकांनी संगीत भजन पद्धतीप्रमाणे प्रार्थना, भजन, रूपाचा अभंग किंवा ध्यानाचा अभंग, गजर, अभंग गौळण, गजर सादर करावेत. परीक्षकांचा व आयोजकांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यावी. सदर भजन स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना किंवा प्रतिनिधींना बक्षीस वितरणास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. अन्यथा पुढील वर्षीच्या स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे नियम आयोजकांच्या वतीने ठेवण्यात आले आहेत.