'कदंबा'चे मानले हेमंत मराठेंनी आभार

▪️ वेंगुर्ला आगाराच्या कारभार ओढले ताशेरे
Edited by: विनायक गांवस
Published on: September 14, 2025 13:58 PM
views 58  views

सावंतवाडी : वेंगुर्ला आगारात अधिकाऱ्यांची मनमानीच असते. यात वाहक-चालकांना दोषी धरलं जातं. परंतु, अधिकाऱ्यांचेच नियोजन नसून मी दिलेल्या इशाऱ्यानंतर बंद केलेली गाडी त्यांनी पुर्ववतही केली. तसेच प्रसारित झालेल्या बातमीची दखल गोवा केटीसीएलनेही घेतली. येथील  प्रवाशांची मागणी असल्याने अतिरिक्त गाडी कदंबाने सुरू केली असून त्यासाठी आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो, असे मत मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी व्यक्त केले. 

वेंगुर्ला आगाराच्या भोंगळ कारभारावर मराठे यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. वेंगुर्ला-सातार्डा बस फेरी अनागोंदी नियोजनामुळे प्रवाशांना मोठा फटका बसला होता. सर्वसामान्य प्रवासी व विशेष करून विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागत होता. ही बस बरी तात्काळ पूर्ववत न केल्यास वेंगुर्ला आगाराची एकही बस मळेवाड गावातून पुढे जाऊ देणार नाही असा इशारा उपसरपंच श्री. मराठे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर गोव्यातून "वास्को ते वेंगुर्ला" व  ''पणजी ते वेंगुर्ला'' मळेवाड मार्गे अशी बससेवा सुरू करण्याचा निर्णय केटीसीएलने घेतला. याबाबत मराठे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 

मराठे म्हणाले, कदंबाचे येथील प्रवाशांच्यावतीने आभार व्यक्त करतो. राज्य एसटी परिवहनकडून प्रवासी असताना देखील नियोजन झाले नाही. त्यामुळे प्रवाशांना हाल, अपेष्टा सोसाव्या लागत होत्या. वेंगुर्ला आगारावर आपली यासाठी नाराजी असून कंदबाने परराज्यातील असूनही प्रवाशांच हीत लक्षात घेतलं. आपल्या फायद्याचा व प्रवाशांच्या हिताचा  विचार त्यांनी केला आहे. त्यासाठी त्यांचे धन्यवाद देत असताना वेंगुर्ला आगाराने यातून काहीतरी बोध घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान, नव्यानं सुरू झालेल्या कदंबा गाडीचा सर्वांना फायदा होणार आहे. या बसचे मळेवाड प्रवाशांच्या माध्यमातून आम्ही  स्वागत करू अशी माहिती मराठे यांनी यावेळी दिली.