गणरायाला १००० दुर्वांची जुडी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 29, 2025 17:49 PM
views 63  views

सावंतवाडी : येथील सामाजिक कार्यकर्ते अजित सांगेलकर व त्यांच्या सौभाग्यवती यांनी आपले पाल्ये नेहा, आर्या, आणि यशराज यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व यशोकिर्तीसाठी तसेच त्यांच्या भावी जीवनात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून गणराज चरणी चक्क 1000 दुर्वांची जुडी अर्पण केली आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी एक प्रकारे 'आदर्श पालकत्व' निभावले आहे.

विघ्नहर्ता गणरायाला आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या भावी आयुष्यात त्यांनी आपापल्या क्षेत्रात यशोशिखर गाठावे, म्हणून अजित सांगेलकर आणि त्यांच्या सौभाग्यवती तसेच त्यांचे पाल्य नेहा, आर्या आणि यशराज यांनी गणराया चरणी चक्क 1000 दुर्वांची जोडी अर्पण केली आहे. गेली अनेक वर्ष गणरायाचे भक्त असलेले आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले अजित सांगेलकर यांनी आदर्श पालकत्व निभावले आहे. त्याबद्दल त्यांचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे.