सालईवाड्याच्या राजा'चं जल्लोषात आगमन

Edited by:
Published on: August 26, 2025 10:50 AM
views 333  views

सावंतवाडी : लोकामान्य टिळकांच्या आवाहनाला तळकोकणातून प्रतिसाद देत प्रतिष्ठापना केलेला पहिला सार्वजनिक गणपती सावंतवाडीतील 'सालईवाड्याच्या राजा'. या गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले. यंदा १२० वे वर्ष असून २१ दिवस मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. वाद्याच्या गजरासह नाचत-गाजत, फटाक्यांची आतषबाजी करत रात्री गणरायाचे आगमन झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

भारत पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते. यावेळी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली. तेव्हा या परंपरेला कोकणात पहिल्यांदा सावंतवाडी शहरानं प्रतिसाद दिला. गेल्या ११९ वर्षापासून सालईवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जात आहे. यंदा मंडळाचे १२० वे वर्ष आहे. गणेश चतुर्थी पासून पुढील २१ दिवस जल्लोषात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सावंतवाडीतील सालईवाडा येथे सन १९०६ मध्ये कै. विष्णुशेठ सापळे व कै. सितारामशेठ बांदेकर यांनी कोकणातील सर्वात पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करत गणरायाची प्रतिष्ठापना केली होती.

सोमवारी रात्री वाद्यांचा गजरासह  नाचत-गाजत, फटाक्यांची आतषबाजी करत या मंडळाच्या गणरायाचं आगमन करण्यात आले. चतुर्थी पासून पुढील २१ दिवस विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी राबविले जाणार आहेत. या आगमन सोहळ्याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजा स्वार, उत्सव कमिटी अध्यक्ष प्रतिक बांदेकर, सचिव बाळा नार्वेकर, सहसचिव अभय नेवगी, आबा पडते, प्रथमेश विर्नोडकर, विनोद सावंत, प्रसाद नार्वेकर, गुरुदास पेडणेकर, संतोष खानविलकर, सुमित मळीक, अमय महाजन, संकेत नेवगी, प्रल्हाद बांदेकर, अथर्व सावंत, राजेंद्र भाट, जितेंद्र भाट आदी उपस्थित होते