बांदा मंडल मधील भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटप

संदिप गावडे यांचा उपक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: August 25, 2025 18:30 PM
views 43  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बांदा मंडल मधील भजनी मंडळांना भजनी साहित्य वाटप करण्यात आले. संदिप गावडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.  गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भजनी मंडळांना प्रोत्साहन देऊन सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवण्याच्या हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संदिप गावकडे यांच्यामार्फत भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले.

बांदा मंडलातील एकूण ३९ मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, युवा नेते संदीप गावडे,जिल्हा चिटणीस महेश नाईक, बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, बांदा मंडल सरचिटणीस मधुकर नाईक, बांदा सरपंच प्रियांका नाईक ,बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर, आदी मान्यवर तसेच बांदा मंडल मधील सर्व भजनी मंडळांचे सदस्य उपस्थित होते.