गणेश चतुर्थीनिमित्त मंगेश तळवणेकर यांच्याकडून शिधावाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: August 25, 2025 15:33 PM
views 88  views

सावंतवाडी : गणेश चतुर्थीनिमित्त मंगेश तळवणेकर यांच्याकडून शिधावाटप करण्यात आले. सन 1989 मध्ये शिवसेना विभाग प्रमुख असल्यापासून गणेश चतुर्थीला कारिवडे गावात शिधावाटप करण्यास सुरुवात केली होती. आताही गरजूंना शिधावाटप केले जाते. 

विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे शेकडो अंधबांधवांना व गरजूंना तेल, तुरडाळ, साखर, गुळ, वाटाणे व अगरबत्ती वाटप करण्यात आले. यावेळी कारिवडे गावचे पुरोहीत समीर भिडे उपस्थित होते. संस्थेचे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र, कोकण विभाग अध्यक्ष बाबुराव गावडे, सेक्रेटरी महेश आळवे व शेकडो अंधबांधव व गरजू उपस्थित होते. यासाठी विठ्ठल मंदिराची जागा विनामूल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष ॲड.दिलीप नार्वेकर यांचे आभार मानण्यात आले. यावेळी इतर भागातील गरजूंना घरपोच शिधावाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.‌