सेनेच्या सावंतवाडी तालुका प्रमुखपदीपदी दिनेश गावडे

Edited by: विनायक गांवस
Published on: August 25, 2025 15:04 PM
views 145  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आले असून सावंतवाडी तालुका प्रमुखपदी युवा नेतृत्व दिनेश गावडे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिली.आमदार तथा माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार हे फेरबदल करण्यात आल्याचे ते म्हणाले. जिल्हाप्रमुख श्री परब यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणी मध्ये सावंतवाडी तालुक्यासाठी दोन तालुकाप्रमुख नेमण्यात आले असून यामध्ये नारायण उर्फ बबन राणे यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली असून त्यांच्यावर माजगाव इन्सुली, बांदा आणि आरोंदा या जिल्हा परिषदेची जबाबदारी तर दिनेश गावडे यांच्यावर आंबोली,कोलगाव, माडखोल,मळेवाड आणि तळवडे अशी जबाबदारी देण्यात आली आहे.

सावंतवाडी शहरातील बाबू कुडतरकर यांचे काम लक्षात घेता त्यांना पुन्हा एकदा शहर प्रमुखपदी कायम ठेवण्यात आले आहे. दोडामार्ग तालुकाप्रमुख पदी गणेशप्रसाद गवस यांच्यावर पुन्हा जबाबदारी देण्यात आली असून दोडामार्ग शहर प्रमुखपदी योगेश महाले यांची निवड करण्यात आली आहे.

वेंगुर्ला तालुका प्रमुख पदी नितीन मांजरेकर यांना पुन्हा कायम ठेवतानाच काशिनाथ नार्वेकर यांच्यावरही जबाबदारी देण्यात आली आहे. या ठिकाणी दोन तालुकाप्रमुख नेमण्यात आलेत. तर शहर प्रमुख म्हणून उमेश येरम यांची निवड करण्यात आली. या संपूर्ण कार्यकारणी मध्ये सहा जणांवर उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी संपवण्यात आली आहे. यामध्ये झेवियर फर्नांडिस,राजेंद्र निंबाळकर,शैलेश दळवी,सुनील मोरजकर,सचिन देसाई, विनायक दळवी यांची नेमणूक करण्यात आली.

यावेळी श्री परब म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार कार्यकारणीमध्ये फेरबदल करण्यात आले असून ही नवी कार्यकारणी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जोमाने काम करून शिवसेनेचा झेंडा निश्चितच उंचावतील. यावेळी दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नवनिर्वाचित तालुकाप्रमुख दिनेश गावडे, सुधा कवठणकर,अर्चित पोकळे, प्रेमानंद देसाई, सुजित कोरगावकर, क्लॅटेस्ट फर्नांडिस आधी उपस्थित होते.