सावंतवाडीत वारसा संगीत सभा

Edited by: विनायक गांवस
Published on: August 23, 2025 16:24 PM
views 114  views

सावंतवाडी : सम्राट क्लब माशेल आयोजित वारसा संगीत सभा उद्या दि. २४ रोजी सायं. ५ वा. सावंतवाडी येथील राजवाड्यात साजरी होणार आहे. वारसा संगीत सभेची ही ४१ वी मैफल आहे. या कार्यक्रमाला सावंतवाडी राजघराण्याचे खेम सावंतभोसले, शुभदादेवी खेम सावंतभोसले, लखमराजे सावंतभोसले, श्रद्धाराजे सावंतभोसले, सम्राट क्लब इंटरनॅ शनलचे अध्यक्ष प्रवीण सबनीस उपस्थित राहणार आहेत. मैथिली च्यारी, शरण्या पिसुर्लेकर, शुभ्रा नाईक, रोहिणी वझे, गीताश्रुती गजानन वझे, कृतिका गावस यांची गायन मैफल तसेच अमित भोसले व शिष्यवर्गातर्फे तबला जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. आकाश जल्मी, अक्षय गावडे, मिलिंद परब साथसंगत करतील. सम्राट माशेलचे अध्यक्ष मंगेश गावकर व वारसा कार्यक्रमाची संकल्पना असलेल्या प्रचला आमोणकर उपस्थिती असणार आहे.