मुंबई युनिवर्सिटीच्या ५८ व्या युवा महोत्सवात बांदेकर कॉलेजची चमकदार कामगिरी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 23, 2025 11:43 AM
views 92  views

सावंतवाडी : मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित ५८ व्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या झोनल फेरीत बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट, सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी कलाविभागात चमकदार यश संपादन केले आहे.

रांगोळी स्पर्धा लक्ष्मण गोविंद पाटील प्रथम क्रमांक, ऑन द स्पॉट पेंटिंग मधुसूदन वसंत सामंत द्वितीय क्रमांक, कार्टूनिंग  दुर्गा वासुदेव धुरी प्रथम क्रमांक, कोलाज शर्वरी शरद सावंत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. संस्थाध्यक्ष रमेश भाट, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. उदय वेले, युवा महोत्सव संयोजक प्रा. तुळशिदास नाईक, सौ. क्रांती कुबल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावतीने विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. राज्यस्तरीय फेरी मुंबई येथे २२ ते २४ सप्टेंबर रोजी होणार असून त्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.