भाजपाकडून वि. स. खांडेकर विद्यालययात वह्यावाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: August 22, 2025 20:12 PM
views 52  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहर मंडलच्यावतीने वि.स.खांडेकर विद्यालय सावंतवाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या वाटप हा कार्यक्रम करण्यात आला.

वि.स.खांडेकर विद्यालयातील विभागीय रोलर स्केटिंग 17 वर्षाखालील स्पर्धेसाठी जान्हवी दिपक जाधव व जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी आदर्श पाटील यांची निवड करण्यात आली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी भाजप शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सरचिटणीस दिलीप भालेकर, संजू शिरोडकर जिल्हा कार्यकारणी सदस्य, माजी नगरसेवक आनंद नेवगी व जिल्हा कार्यकारणी सदस्या व माजी नगरसेविका सौ.दिपाली भालेकर तसेच राजाराम पवार मुख्याध्यापक सतिश धुमाळे श्रीशैल परीट, सुरेश कोळी सौ.सारिका शृंगारे, सौ.मयुरी इन्सुलकर व विद्यार्थी उपस्थित होते.