
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथील अधिपरिचारीका श्रीमती एल.एच. पवार यांची जिल्हा रूग्णालयात झालेली बदली रद्द करत त्यांना आता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस.एच. पाटील यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी नुकतीच नाराजी व्यक्त करत यासाठी शल्य चिकित्सक यांना विनंती केली होती.
याआधी श्रीमती पवार यांची बदली उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा येथून जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे झाली होती. मात्र, आता हा पूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार, त्यांना उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे तात्काळ रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांना रुग्णालयाचे कामकाज तातडीने सांभाळण्यास सांगितले आहे. यापूर्वी सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून अपघात विभागात स्टाफ कमी असल्याने अधिपरिचारीका देण्यात यावी अशी विनंती केली होती. मात्र, शासनाच दुर्लक्ष याकडे झालं होतं. काल घडलेल्या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करताच आज हे निर्देश काढण्यात आले असून यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांचे आभार मानले आहेत.